BJP Candidates: भाजपच्या पहिल्या यादीत 'लाडक्या बहिणी'चा हुकमी एक्का; गेम चेंजर ठरणार की..?

Assembly Elections BJP Woman Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. यासाठी आता भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. यात १३ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Assembly Elections BJP Woman Candidates
Assembly Elections BJP Woman CandidatesESakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये १३ महिलांचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यासह विधानसभा निवडणुकीची यादी जाहीर करणारा भाजप हा महाराष्ट्रातील पहिला पक्ष ठरला आहे. तसेच उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपने 'लाडक्या बहिणी'चा हुकमी एक्का बाहेर काढला आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत एकूण ९९ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नागपूर पश्चिम या पारंपरिक मतदारसंघातून तर चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. श्रीजया पहिल्यांदाच भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. श्रीजया यांची ही पहिलीच निवडणूक असेल. आतापर्यंत त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत होत्या. मात्र आता विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत.

Assembly Elections BJP Woman Candidates
BJP Assembly Candidate: भाजपच्या पहिल्या यादीत फडणवीसांसह '99' शिलेदाराचं 'कमळ' निश्चित

या निवडणुकीतही आपल्याला जनतेचा पाठिंबा मिळणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. याआधीही त्या या मतदारसंघात चांगले काम करत होत्या आणि आता उमेदवार म्हणून त्यांना काम करण्यास आणखी बळ मिळणार आहे. ते म्हणाले की, चव्हाण कुटुंबाने ४० वर्षांहून अधिक काळ या मतदारसंघाची सेवा केली आहे. आगामी काळात ती भरघोस यश मिळवेल याची तिला खात्री आहे. तर दुसरीकडे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांनाही संधी देण्यात आली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपने लाडकी बहिणींना संधी देत नवी खेळी खेळली आहे. आता या बहिणी निवडणुकीत पडणार की पाडणार? हे पाहणं तितकंच महत्ताचं ठरणार आहे.

भाजपच्या यादीत 13 महिलांचा समावेश

श्रीजया अशोक चव्हाण – भोकर

अनारधाताई अतुल चव्हाण – फुलंबारी

सीमाताई महेश हिरे- नाशिक

सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व मांडा

मंदा म्हात्रे – बेलापूर

मनीषा अशोक चौधरी – दहिसर

विद्या ठाकूर - गोरेगाव

माधुरी सतीश मिसाळ – पार्वती

मोनिका राजीव राजळे - शेगाव

प्रतिभा पाचपुते – श्रीगोंदा

नमिता मुंदडा - केज

श्वेता महाले – चिखली

मेघना बोर्डीकर - जिंतूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.