भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Eknath Shinde Shiv Sena Candidate: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत 20 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पक्षाने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे.
cm eknath shinde and dcm devendra fadanvis
cm eknath shinde and dcm devendra fadanvisesakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 20 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. मिलिंद देवरा यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. वरळी ही ती जागा आहे जिथून उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. आता या जागेसाठी दोघांत थेट भिडत होणार आहे. तर यात काही भाजपचे नेते आहेत त्यांना एकनाथ शिंदेंच्या चिन्हावरून निवडणूक लढवावी लागणार आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघातून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रिसोडमधून भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पुरंदरमधून विजय शिवतारे यांना तर कुडाळमधून नीलेश राणे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. कुडाळमध्ये राणेंचा सामना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याशी होणार आहे. शिंदे गटाच्या दुसऱ्या यादीनुसार अक्कलकुवा येथून आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बाळापूरमधून बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या ठिकाणी त्यांचा सामना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याशी होणार आहे. रिसोडमध्ये भावना गवळी यांना संधी देण्यात आली आहे.

cm eknath shinde and dcm devendra fadanvis
ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

शिंदे गटाच्या या यादीतील विशेष बाब म्हणजे या यादीत पक्षाने आपल्या चिन्हावर भाजप नेत्यांना उमेदवारी दिली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेने मुरजी पटेल यांना तिकीट दिले आहे. मुरजी पटेल हे भाजपचे नेते आहेत. कुडाळ मतदारसंघातून निलेश नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निलेश राणे हे याआधी भाजपमध्ये होते. त्यांनी नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या निवडणुकीत महायुतीत भाजपचे नेते मित्रपक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. मात्र असं का झालं हा प्रश्न सर्वानाच पडला आहे.

दरम्यान महायुतीमध्ये सुरुवातीला भाजपसोबत एकनाथ शिंदे यांनी हातमिळवणी केली होती. त्यानंतर या युतीमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाली. यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली गेली. यात मोठा उलटफेर दिसून आला आहे. तीन पक्षांत जागावाटपासाठी मोठ्या कसरती कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे काही जागांची अदलाबदल करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मित्रपक्षांच्या चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.