विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Devendra Fadnavis statement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर केली आहे. यानंतर देवेंद्र फडणविसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal
Updated on

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिकीट दिले आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. भारतीय जनता पक्षाने मला सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीत संधी दिल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लिहिले की, पक्ष नेतृत्व, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील जनतेने आणि माझ्या मातृभूमीतील जनतेने दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न राहील. भाजपच्या पहिल्या यादीत माझ्याशिवाय इतर ९९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. त्यांचे आणि या यादीत समाविष्ट असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

Devendra Fadnavis
BJP Candidate 2nd List Loksabha 2024: भाजपच्या ७२ उमेदवारांची घोषणा! कोणत्या राज्यात कुणाला मिळालं तिकीट? संपूर्ण माहिती...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे. याच्या महिनाभरापूर्वीच भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात प्रचारासाठी फार कमी दिवस राहिले आहेत. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. देवेंद्र फडणवीस २००९ पासून नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक जिंकत आहेत.

Devendra Fadnavis
BJP Candidates: भाजपच्या पहिल्या यादीत 'लाडक्या बहिणी'चा हुकमी एक्का; गेम चेंजर ठरणार की..?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्याबद्दल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, पक्ष आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी बहुमताने निवडणूक जिंकणार आहे.

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्याबद्दल भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले की, मला ही संधी दिल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि हायकमांडचे आभार मानू इच्छितो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.