Maharashtra Assembly Elections: महाविकास आघाडीत जागावाटपावर तिढा! २४० ते २५० जागांवर सहमती, इतर जागांचं काय?

Mahavikas Aghadi Finalizing Seat Sharing: Key Decisions Pending: आज विदर्भातील काही महत्त्वाच्या जागांवर चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये १० ते १५ जागांबाबत विचारविनिमय होणार आहे. या भागात तीन पक्षांमधील तिढा सोडवण्यासाठी महत्त्वाची चर्चा होईल.
Mahavikas Aghadi leaders during a meeting to finalize seat sharing for the upcoming elections.
Mahavikas Aghadi leaders during a meeting to finalize seat sharing for the upcoming elections. Sakal
Updated on

Maharashtra MVA Political Updates in Marathi: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा निर्णायक टप्प्यावर आहेत. सध्या २४० ते २५० जागांवर सहमती झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे, परंतु उर्वरित जागांबाबत अजूनही तिढा कायम आहे. या जागांवर निर्णय घेण्यासाठी पुढील बैठकांमध्ये चर्चा होणार असून काही निर्णायक भूमिका घेण्याची अपेक्षा आहे.

विदर्भातील जागांवर विशेष लक्ष-

आज विदर्भातील काही महत्त्वाच्या जागांवर चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये १० ते १५ जागांबाबत विचारविनिमय होणार आहे. या भागात तीन पक्षांमधील तिढा सोडवण्यासाठी महत्त्वाची चर्चा होईल. विदर्भातील बहुतेक जागांवर निर्णय झाला असला तरी काही ठिकाणी अजूनही सहमती होणे बाकी आहे. या भागातील विधानसभा जागांवर २०१९ च्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाने किती मतं मिळवली, दुसऱ्या स्थानी कोणता पक्ष होता, याचाही विचार करण्यात येत आहे.

कोण किती जागा लढवणार?-

शिवसेना ठाकरे गट सुमारे १०० जागांवर लढणार आहे, तर काँग्रेस १०० पेक्षा जास्त जागांवर दावा करीत आहे. मात्र, नेमका आकडा तिढा सुटल्यावर स्पष्ट होईल. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना त्यांच्या ताकदीच्या आधारावर जागा वाटप केल्या जातील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी जिंकलेल्या १५४ जागा आहेत त्या त्याच पक्षांना राखीव ठेवण्यात आल्या आहेत. काही जागांवर मात्र फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mahavikas Aghadi leaders during a meeting to finalize seat sharing for the upcoming elections.
RBI MPC Meeting: गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घेतला मोठा निर्णय; तुमचा EMI कमी झाला का?

जागावाटपाचं समीकरण-

आघाडीतील उर्वरित ८६ जागांसाठी २०१९ च्या निवडणुकांतील मतं, दुसऱ्या स्थानी असलेला पक्ष, आणि २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेली मतं यांचा विचार करून जागा वाटप केल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत यावर निर्णय होईल. जर काही जागांवर सहमती झाली नाही तर, तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन तिढा सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील काही दिवसांत होणार निर्णय-

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर शेवटचा निर्णय येण्यासाठी अजून काही दिवस लागतील. विदर्भासह इतर महत्त्वाच्या विभागातील जागांवर झालेल्या चर्चेनंतर, ४०-५० जागांवरील तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर काही जागांवर अजूनही निर्णय झालेला नसेल तर, पक्ष प्रमुख यावर अंतिम निर्णय घेतील आणि या जागांवर निवडणुकीच्या तयारीसाठी उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल.

#ElectionWithSakal

Mahavikas Aghadi leaders during a meeting to finalize seat sharing for the upcoming elections.
"वाजत गाजत गुलाल उधळत..." शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा धमाकेदार टीझर; ठाकरेंचा आवाज अन् फटाक्यांची आतिषबाजी, पाहा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.