Ajit Pawar Candidates List: विधानसभेसाठी NCP अजित पवारांची पहिली यादी जाहीर, वळसे पाटलांसह 'इतक्या' उमेदवारांना संधी

Assembly Elections NCP Ajit Pawar group Candidates List: महायुतीने विधानसभेसाठी जय्यत तयारी केली आहे. भाजपनंतर आता अजित पवार गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarESakal
Updated on

Ajit Pawar Candidates List: महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी अजित पवार गटाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपने आपल्या यादीची घोषणा केल्यानंतर, महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पहिल्या यादीत एकूण ३८ उमेदवारांचा समावेश असून, या निवडणुकीत महायुतीला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

अजित पवार बारामतीतून अर्ज दाखल करणार

अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढवतील, तर २८ ऑक्टोबरला त्यांनी आपला अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती हे अजित पवारांचे गड मानले जाते, त्यामुळे त्यांच्या या उमेदवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

येत्या निवडणुकीत अजित पवार गटाने आणखी एक महत्त्वपूर्ण उमेदवार जाहीर केला आहे, ते म्हणजे येवला येथून छगन भुजबळ. भुजबळ हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असून त्यांची उमेदवारी महत्वाची मानली जात आहे.

महिला सक्षमीकरणाकडे लक्ष

अजित पवार गटाने यादीत महिलांना सन्मानजनक स्थान दिले आहे. उदगीर येथून संजय बनसोडे, श्रीवर्धन येथून अदिती तटकरे यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच, राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना अर्जुनी मोरगाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

Ajit Pawar
Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : जरांगे यांच्या यादीवर शिवसेनेची नजर

अजित पवार गटाची संपूर्ण यादी

  • अजित पवार - बारामती

  • छगन भुजबळ - येवला

  • हसन मुश्रीफ-कागल

  • धनंजय मुंडे - परळी

  • नरहरी झिरवाळ - दिंडोरी

  • अनिल पाटील - अमळनेर

  • राजू कारेमोरे - तुमसर

  • धर्मरावबाबा आत्राम - अहेरी

  • इंद्रनील नाईक - पुसद

  • चंद्रकांत नवघरे - वसमत

  • नितीन पवार - कळवण

  • माणिकराव कोकाटे - सिन्नर

  • दिलीप बनकर - निफाड

  • सरोज अहिरे - देवळाली

  • दौलत दरोडा - शहापूर

  • अदिती तटकरे - श्रीवर्धन

  • संजय बनसोडे - उदगीर

  • अतुल बेनके - जुन्नर

  • दिलीप वळसे पाटील - आंबेगाव

  • दिलीप मोहिते - खेड - आळंदी

  • दत्तात्रय भरणे - इंदापूर

  • यशवंत माने - मोहोळ

  • सुनिल शेळके - मावळ

  • मकरंद पाटील - वाई

  • शेखर निकम - चिपळूण

  • अण्णा बनसोडे - पिंपरी

  • सुनिल टिंगरे - वडगाव शेरी

  • राजेश पाटील - चंदगड

  • चेतन तुपे - हडपसर

  • किरण लहामटे - अकोले

  • संजय शिंदे - करमाळा

  • देवेंद्र भुयार - मोर्शी

  • आशुतोष काळे - कोपरगाव

  • संग्राम जगताप - अहमदनगर शहर

  • प्रकाश सोळंके - माजलगाव

  • बाबासाहेब पाटील - अहमदपूर

  • सना मलिक - अणुशक्तीनगर

  • नवाब मलिक - शिवाजीनगर मानखुर्द

  • अमरावती शहर - सुलभा खोडके

  • इगतपुरी - हिरामण खोसकर

Ajit Pawar
Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : अतुल सावे यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्षाने पूर्वमध्ये कसली कंबर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.