नवी दिल्लीः महायुतीतील जागावाटपाचा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीतही जवळपास 6 जागांवर अद्यापही तोडगा दृष्टीपथात आलेला नाही. या सहा जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येकी तीन जागांवर दावा कायम ठेवल्याचे समजते.