Deoli Assembly Election: देवळी विधानसभेत रणजित कांबळे यांना सहाव्यांदा संधी! भाजप काँग्रेसचा विजयरथ रोखणार?

Deoli Assembly Election maharashtra 2024 update: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: देवळी विधानसभेतील काँग्रेस विरुद्ध महायुतीची थेट लढत!
Congress leader Ranjit Kamble campaigning in Deoli for the Maharashtra Assembly Elections 2024
Congress leader Ranjit Kamble campaigning in Deoli for the Maharashtra Assembly Elections 2024esakal
Updated on

वर्धा : काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली असून, देवळी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रणजित कांबळे यांना सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर सलग पाच वेळा विजय संपादन केलेल्या कांबळे यांनी देवळीतील विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच, देवळीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या मतदारसंघात काँग्रेस आणि महायुतीत भाजपच्या उमेदवार राजेश बकाने यांच्यात थेट लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.