मतदानाची तारीख जवळ येत आहे तसं तसं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील चांगलचं पेटलं आहे. पक्षांतर, बंडखोरीचा सपाटा सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना राज्यात रंगणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेमध्ये झालेल्या बंडानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूर अस्तित्वाची होणार आहे. दोन्ही पक्षाचे दोन गट निर्माण झाल्यामुळे जागावाटपाचा मोठा गोंधळ राज्यात निर्माण झाला. यामुळे पक्षांतर आणि बंडखोरीला वाट मोकळी झाली.