यंदाही वाढत्या टक्केवारीची परंपरा कायम ठेवत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला आहे. करवीर मतदारसंघात (Karveer Constituency) जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान झाले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत (Kolhapur Assembly Elections) मतदानाची टक्केवारी वाढविण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. या निवडणुकीत उच्चांकी सुमारे ७६.१७ टक्के इतके मतदान (Voting) झाले. त्यामुळे कोल्हापूर राज्यात भारी ठरले.