जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सत्तेत, तर कधी विरोधामध्ये प्रमुख पक्ष म्हणून भाजप राहिला आहे.
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी एकही जागा भाजपला (BJP) दिलेली नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे. महायुतीतील मित्रपक्षाचे आमदार निवडून आल्यानंतर जिल्ह्यात भाजप कशी वाढणार आणि भाजपमध्ये आलेले कार्यकर्ते भविष्यात कसे टिकणार, असा प्रश्न आता स्थानिक नेत्यांना पडला आहे.