Assembly Elections: भाजपचा सिक्रेट प्लॅन ठरला! ठाकरेंच्या बालेकिल्ल्याना सुरुंग लावण्यासाठी वापरणार 'ही' ट्रिक

BJP's Plan to Defeat Uddhav Thackeray in Konkan Mumbai: मुंबई आणि कोकणातील निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांनी आपापल्या रणनीती ठरवल्या आहेत. आगामी विधानसभेत कोणता पक्ष जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
The Battlefield for BJP and Shiv Sena in Maharashtra Elections
The Battlefield for BJP and Shiv Sena in Maharashtra Electionsesakal
Updated on

Maharashtra Political Updates: भाजपने ठाकरेंच्या बालेकिल्ल्याना विधानसभेत सुरुंग लावण्यासाठी विस्तृत रणनीती आखली आहे. मुंबई आणि कोकणात सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजपने विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकण आणि मुंबईसाठी काय केले आणि काय केले नाही याचा पाढाच भाजप नेते आता वाचणार आहेत.

आक्रमक प्रचार मोहिम-

मुंबई आणि कोकणात ठाकरे विरोधात भाजप अधिक आक्रमक होणार आहे. महायुती सरकारने कोकण आणि मुंबईसाठी केलेली कामे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. ठाकरे गटात नाराज असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न देखील होणार आहे. कोकणसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबईसाठी आशिष शेलार यांच्याकडे रणनीती ठरवण्याचे काम सोपवले जाणार आहे.

महाविकास आघाडीची तयारी

महाविकास आघाडीची तयारी देखील जोरात सुरु आहे. नवी दिल्लीतील बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. ‘१० सप्टेंबरच्या आत जागावाटप पूर्ण व्हायला हवं’ अशी इच्छा ठाकरे यांनी व्यक्त केली. जागावाटप लवकर पूर्ण झाल्यास प्रचाराला जास्त वेळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

The Battlefield for BJP and Shiv Sena in Maharashtra Elections
Uddhav Thackeray In Delhi: पापा को बोलो, वॉर रुकवा दो....बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ल्याप्रकरणात उद्धव ठाकरे काय म्हणाले?

जागावाटपातील निर्णय-

आधी लढलेल्या काही जागांची अदलाबदल करण्याची गरज पडल्यास ती करण्यावर तिन्ही पक्षातील नेत्यांचे एकमत आहे. लोकसभेला झालेल्या चुका कशा टाळता येतील यावर देखील बैठकीत चर्चा झाली. साम टीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचे जागावाटप महिन्याभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

The Battlefield for BJP and Shiv Sena in Maharashtra Elections
Nitesh Rane: नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, माझगाव कोर्टाचा दणका! नेमकं काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.