Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाची चर्चा अन् सिंचन घोटाळ्याची खपली; अजितदादांनी 'त्या' दोन दुखऱ्या नसींवर ठेवले बोट

Maharashtra Assembly Elections : अजित पवारांच्या (Ajit Pawar) या वक्तव्यांमधून महाराष्ट्राचा कालचा मंगळवार ढवळून निघाला.
Ajit Pawar
Maharashtra Assembly Electionsesakal
Updated on
Summary

अजित पवारांचा हा ‘फुलटॉस’ आर. आर. पुत्र रोहित यांनी तूर्त खेळून काढला आहे. समाजमाध्यमांच्या भिंतींवर गृहमंत्री म्हणून आर. आर. पुन्हा एकदा झळकले.

Maharashtra Assembly Elections : इस्लामपूर आणि तासगावमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी तत्कालीन काँग्रेस (Congress) आघाडी सरकारच्या काळातील दोन दुखऱ्या नसींवर बोट ठेवले. आघाडी सरकारला हद्दपार करण्यात महत्त्वाचा ठरलेल्या अजित पवार यांच्यावर अमीट ठपका ठेवणाऱ्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीला गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील (R. R. Patil) यांनी दिलेली चाल आणि अशीच चाल त्यांनाही राष्ट्रवादीच्या नेतृत्वासाठी पवार यांनी दिली होती, जी अजित पवार आणि जयंत पाटील यांना पक्षांतर्गत पातळीवर ‘ब्रेक’ लावणारी ठरली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.