MVA Seat sharing: मोठी बातमी! ठाकरे गटाचा सांगली पॅटर्न.. चर्चेपूर्वीच विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Maharashtra Assembly Elections 2024: उद्धव ठाकरे यांनी काल रंगशारदा येथे शिवसैनिकांचा मेळावा घेत विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. मात्र आज नाशिकमध्ये उमेदवार जाहीर झाल्याने राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
Maha Vikas Aghadi
Maha Vikas Aghadiesakal
Updated on

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याने महायुतीने जोरदार कंबर कसली आहे, तर महाविकास आघाडीने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र या निवडणुकीत सर्वात मोठा पेच हा जागा वाटपाचा असणार आहे. महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. जागावाटपाच्या चर्चेपूर्वी ठाकरे गटाने नाशिकमध्ये आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.

सुधाकर बडगुजर लढणार-

शिवसेनेच्या मेळाव्यात एकमताने ठराव मंजूर झाला असून, नाशिक पश्चिम मतदार संघातून सुधाकर बडगुजर तर मध्य मतदारसंघातून वसंत गीते यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे. यामुळे मविआमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. आत महाविकास आघाडील शरद पवार गट आणि काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल रंगशारदा येथे शिवसैनिकांचा मेळावा घेत विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. मात्र आज नाशिकमध्ये उमेदवार जाहीर झाल्याने राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शरद पवार गट आणि काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याजवळ नाराजी व्यक्त करणार असल्याचे बोलले जात आहे.  

Maha Vikas Aghadi
Vidhan Sabha Election : अधिक जागा जिंकेल, त्या पक्षाचा मुख्यमंत्री ; मविआचा फॉर्म्युला,जागा वाटपावर चर्चा सुरू

महायुतीत देखील नाराजी-

सुनील तटकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीत तणाव वाढला आहे. नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर महायुतीत तणाव वाढला आहे. दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले नाराज झाले आहेत. उमेदवारी जाहीर करण्याचा तटकरे यांनी काय अधिकार आहे, असा सवाल धनराज महाले यांनी उपस्थित केला आहे. उमेदवारीचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असे त्यांनी सांगितले आहे.

धनराज महाले यांचा सवाल-

धनराज महाले यांनी स्पष्ट केले आहे की ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत आणि याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहेत. प्रवेश केला तेव्हाच मुख्यमंत्र्‍यांकडून शब्द मिळाला आहे शब्द, असा दावा धनराज महाले यांनी केला आहे. झिरवाळ कुटुंबियांकडून लोकसभेत विरोधात काम होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

Maha Vikas Aghadi
Sanjay Raut: महाराष्ट्रात राजकीय संघर्ष निर्माण होणार, संजय राऊतांची जीभ घसरली... फडणवीस, शिंदेंवर अत्यंत खालच्या भाषेत टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.