''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मागील ७० वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये लागू नव्हते. येथे ३७० व्या कलमाची भिंत उभी होती. आम्ही ती उद्ध्वस्त केली.''
चिमूर : ‘‘महाराष्ट्राचा गतिमान विकास आघाडीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. विकास थांबविण्यात आघाडी आणि काँग्रेस (Congress) एक्स्पर्ट आहे. आघाडीवाले म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे खिलाडी. आघाडीला लुटीचे लायसन्स देऊ नका,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. क्रांतीभूमी चिमूर येथे आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.