पंचहमी योजनांच्या अंमलबजावणीबाबत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेष विमान किंवा बसेस पाठवू. त्यांनी कर्नाटकात येऊन जनतेशी संवाद साधावा व सत्य जाणून घ्यावे, असे आवाहनही शिवकुमार यांनी केलेय.
बेळगाव : सतत मराठी व हिंदी विरोधी भूमिका घेणाऱ्या कर्नाटकातील नेत्यांना आता मराठी व हिंदी भाषेचा आधार घ्यावा लागला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून गुरुवारी मराठी व हिंदी भाषेत एक पोस्ट शेअर करण्यात आली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) प्रचारात महायुतीकडून कर्नाटकातील पंचहमी योजनांबाबतची चुकीची माहिती सांगितली जात असल्याची तक्रार शिवकुमार यांनी केली आहे.