मुंबई: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज रात्री नऊपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ६५.०२ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाल्याने सर्वपक्षीयांची धाकधूक वाढली आहे. .कोल्हापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ७६.७५ टक्के मतदान झाले असून सर्वांत कमी ५१.२७ टक्के मतदान मुंबई शहरात नोंदविले गेले आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ५३.५७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. मागील निवडणुकीत राज्यात ६१.४० टक्के मतदान झाले होते. राज्यात आज काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला वादावादीचे गालबोट लागले. अनेक ठिकाणांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी परस्परांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. आता येत्या शनिवारी (ता. २३) राज्याचा नवा कारभारी ठरेल.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये झालेली फाटाफूट आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराच्या मैदानात विकासकामांवरून सुरू झालेला प्रचार नंतर धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणावर जाऊन पोचल्याने एकंदर प्रचार प्रक्रियेलाच विखारी रूप आले होते. नांदेड लोकसभा निवडणुकीसाठीही आज मतदान पार पडले. येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.७८ टक्के मतदानाची नोंद झाली.आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सुरूवातीला मतदानाचा ओघ काहीसा कमी होता. अनेक ठिकाणी दुपारनंतर मतदार केंद्रांकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळाले..टक्का वाढला अन् धाकधूकही...मुंबई, पुणे आणि ठाणे या महानगरी भागामध्ये सकाळी तुलनेने मतदानाचा टक्का कमी होता पण दुपारनंतर येथे मतदान वाढल्याचे दिसून आले. राजकीय नेत्यांप्रमाणे, सेलिब्रेटी मंडळींनीही विविध ठिकाणांवर मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मतदान केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात कुटुंबीयांसमवेत मतदान केले. यानंतर फडणवीस यांनी नागपूरमधील विविध बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आई व पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासमवेत बारामतीतील काटेवाडी या गावात मतदान केले. .राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्नी प्रतिभा, मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत बारामतीत मतदान केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपुरातील महाल परिसरात मतदान केले. शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कलानगर परिसरात पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासमवेत मतदान केले. ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनीही दादरमध्ये आई मधुवंती, पत्नी शर्मिला, मुलगा अमित ठाकरे यांच्यासमवेत मतदान केले. जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे पत्नी व मुलांसमवेत मतदान केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्नी, मुलगी व कुटुंबातील अन्य सदस्यांसमवेत मतदान केले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये मतदान केले..नांदगावमध्ये भुजबळ-कांदे यांच्यात राडानाशिकमधील नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर नेते समीर भुजबळ यांच्यात सकाळी चांगलाच राडा झाला. महायुतीचे उमेदवार कांदे यांनी त्यांच्या महाविद्यालयात ऊसतोड कामगारांना एका ठिकाणी डांबून ठेवत पैसे वाटप केल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. यावेळी भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांनी कांदे यांनी पैसे देण्यासाठी आणलेल्या कामगारांना पकडले. यानंतर कांदे-भुजबळ यांच्यात शिवीगाळ सुरू झाली. आज तुझा मर्डरच करतो, अशी धमकी कांदे यांनी समीर भुजबळ यांना दिली त्यानंतर तर भुजबळ समर्थक जास्तच चिडले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला. बारामती विधानसभा मतदारसंघात महात्मा गांधी बालक मंदिर बुथमध्ये अजित पवार यांच्या गटाकडून मतदारांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला होता.कोल्हापूर राज्यात भारीविधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याची परंपरा कोल्हापूर जिल्ह्याने यंदाही कायम ठेवली आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात उच्चांकी सुमारे ७६.१७ टक्के इतके मतदान झाले. त्यामुळे कोल्हापूर राज्यात भारी ठरले. दुसरीकडे मतदारसंघांमध्येही जिल्ह्यातील करवीर मतदारसंघ राज्यात अव्वल आला आहे. येथे ८४.९५ टक्के मतदान झाले. गेल्या तीन निवडणुका पाहिल्यास ही टक्केवारी वाढतच आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतही करवीर मतदारसंघ अव्वल ठरला होता. यंदाच्या निवडणुकीत कागल मतदारसंघ दुसऱ्या स्थानावर असून, तेथे ८३ टक्के इतके मतदान झाले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.