नागपूर: विधानसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू झाली असून, पहिल्या दिवशी नागपूर जिल्ह्यात विविध मतदारसंघांत एकूण 462 अर्जांची उचल झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अर्ज नागपूर मध्य मतदारसंघातून घेण्यात आले असून, हा आकडा 99 वर पोहोचला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली, ज्यामुळे निवडणुकीचा माहोल अधिकच तापला आहे.