लोकसभेच्या निवडणुकीतील अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाला उभारी देण्यास सुरुवात केली आहे.
सातारा : विधानसभा निवडणुकीत (Satara Assembly Elections) यावेळेस जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत आहे; पण सर्वाधिक लक्षवेधी लढती महायुतीच्या विद्यमान आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने दिलेल्या उमेदवारांमध्ये आहेत. या पक्षाने कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, माण-खटाव, वाई, फलटण या पाच मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. सर्व ठिकाणी काट्याची लढत होत असून, येथे विधानसभेला तुतारी भारी ठरणार का? याची उत्सुकता वाढली आहे.