Mumbai: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने एकीकडे बंडखोरी काबूत ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असतानाच १५२ मतदारसंघांचे ‘कलर कोडिंग (रंगसंगती) करीत धोक्याचे, लढत असलेले आणि जिंकण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघांना रंग देण्यात येणार आहे.
भाजप लढत असलेल्या १५२ आणि मित्रपक्षांच्या चार मतदारसंघात जिंकण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघांना हिरवा, लढत असलेल्या ठिकाणी पिवळा तर धोक्याच्या मतदारसंघांना लाल रंग दिला जाणार आहे. या रंगबदलांकडे दररोज लक्ष दिले जाणार असून पिवळे मतदारसंघ हिरवे तर लालचे पिवळे होण्यावर भर दिला जाईल.