Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

BJP's Historic Victory in Maharashtra Sparks Debate Over Next Chief Minister : महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीची रस्सीखेच जरी सुरू असली तरी सर्व पक्ष सामंजस्याने निर्णय घेतील, असा दावा केला जात आहे. काही नेत्यांच्या मते, भाजपकडून तिसऱ्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो.
Eknath Shinde and Devendra Fadnavis discussing Maharashtra CM post after NDA's election victory
Eknath Shinde and Devendra Fadnavis discussing Maharashtra CM post after NDA's election victoryesakal
Updated on

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. एनडीएने 235 जागांवर विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. यामध्ये भाजपच्या खात्यात 132 जागा गेल्या आहेत, तर शिवसेनेला 57 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला. या विजयानंतर राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत रंगली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.