पुणे: पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेले पटोले पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्रिपदाची निवड जनतेमधून आमदार निवडून आल्यानंतर केली जाते. मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस श्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगून पटोले म्हणाले, ‘‘काँग्रेसची पहिली यादी शुक्रवारी (ता. २५) सायंकाळपर्यंत जाहीर होईल. अनेक पक्षांची आघाडी असते, तेव्हा एका-एका जागेसाठी घासाघीस होत असते. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष ८५ जागा लढविणार आहे. त्यामुळे या जागांचा प्रश्न सुटला आहे. काही जागांवर चर्चा सुरू आहे.