धाराशिव : आपल्याला मुख्यमंत्रीपद नको पण पंतप्रधान नक्कीच होणार, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. धाराशिव इथं प्रचार सभेत बोलताना त्यांनी भूम आणि परांड्याच्या जनतेला एकदा संधी देण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर काँग्रेस भाजपवर कडाडून हल्ला केला.