नवी दिल्ली : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून बेकायदा फंडिंग करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप भाजपनं केला आहे. या गैरप्रकारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा सहभाग असल्याचा दावाही भाजपनं केला आहे.
विशेष म्हणजे क्रिप्टोकरन्सीमार्फत निवडणुकीसाठी वापरलेला पैसा हा दुबईतून आणला असल्याचंही भाजपनं पत्रकार परिषद घेत सांगितलं. भाजपचे प्रवक्ते सुधांसू त्रिवेदी यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पण या व्हॉईस नोटची अद्याप कुठलीही पुष्टी झालेली नाही.