Beed VBA Marathi News : बीडमधील अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळ फासून मारहाण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार केला आहे. या उमेदवारानं भाजपला पाठिंबा दिल्यानं वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याचा निषेध म्हणून आपण हे कृत्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.