Vote Jihad Marathi News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून सातत्यानं ‘वोट जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा पहिल्यांदा निवडणुकीच्या प्रचारात आणला. पण आता भाजपच्या या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यासाठी त्यांनी पुण्यातील मतदानाचा संदर्भ दिला आहे.