Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हरियाना विधानसभा निकालाची देखील चांगलीच चर्चा आहे. महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं होतं. मात्र विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाचपावरुन झालेल्या गोंधळामुळे राज्यात हरियानासारखी अवस्था होईल का?, अशी चर्चा रंगली आहे. राजकीय पक्षांचा अतिआत्मविश्वास त्यांनी खड्ड्यात घालू शकतो.
हरियानामध्ये देखील हेच झाले होते. कुमारी सैलजा आणि भूपिंदर सिंग हुडा यांच्यातील भांडणामुळे चुकीचा संदेश राज्यात गेला. त्यामुळे त्यांचेच बंडखोर इतके मजबूत झाले की ते अनेक जागा गमावण्याचे कारण बनले. आता महाराष्ट्रातही अशीच भीती आहे, पण यावेळी कोणाचेही नुकसान होऊ शकते. म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही बंडखोरी आणि भांडणामुळे त्रस्त आहेत.