EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?
Chanakya Exit Poll: चाणक्य या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये, महायुतीला १५२ ते १६० जागा येतील असं नमूद करण्यात आलेलं आहे. तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा येतील असा अंदाज आहे. तर ६ ते ८ जागा इतरांच्या येतील.
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार काही पोल हे महाविकास आघाडीच्या बाजूने आले आहेत. तर काही पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळताना दिसून येत आहे.