2024 election and 1995 assembly comparison: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसोबतच यूपीच्या 9 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुका पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्रात ६५.११ टक्के तर झारखंडमध्ये ६८.४५ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांवर ६३.९३ टक्के मतदान झाले. गडचिरोलीत ६९ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ५३.७८ टक्के मतदान झाले. राज्यात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत काही खास गोष्टी घडल्या आहेत, ज्या १९९५ च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देत आहेत.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त बंडखोर होते. तसेच २०२४ मध्येही बंडखोरांचा आकडा जास्त आहे. तसेच आता या मुद्द्याप्रमाणेच अजून एक मुद्दा १९९५ ची आठवण करून देत आहे.