छत्रपती संभाजी नगरच्या रेडीको एनव्ही कंपनीमध्ये मका साठवून ठेवणाऱ्या बॉयलरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 7 ते 8 कामगार बॉयलर खाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. बॉयलरची वेल्डिंग सुरू असताना बॉयलरमध्ये स्फोट झाला. स्फोटामुळं बॉयलर खाली कोसळलं.