Latest Mumbai News: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात २६ नोव्हेंबरपूर्वी नवे सरकार स्थापन होणे आवश्यक आहे; परंतु कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ शकते. बहुतेक एक्झिट पोल्सने महायुतीला बहुमत दिले असले, तरी त्यांना किंवा मविआला निर्णायक आघाडी न मिळाल्यास राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला आमंत्रित करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करता येतो.
विधानसभेच्या निकालानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया महत्त्वाची राहणार आहे. २६ तारखेला विद्यमान विधानसभेचा कालावधी संपणार आहे. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांत नवे सरकार स्थापन करण्याची तयारी राजभवनाला करावी लागणार आहे.