शरद पवारांना सोडणं ही माझी चूक होती, अशी नाव न घेता जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात दिली आहे. राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर या लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.