Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

NCP MLA Marathwada: चार टर्म आमदार तर, तीन वर्षे राज्यमंत्रिपद भूषवणारे प्रकाश सोळंके यांनी शेवटची निवडणूक म्हणून मागील (२०१९) विधानसभा निवडणूक लढवली होती.
MLA Prakash Solankhe
MLA Prakash SolankheEssakal
Updated on

माजलगाव: महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी पुतण्याला राजकीय वारसदार घोषित करून निवृत्तीची घोषण केली होती; परंतु ऐनवेळी ते स्वतःच रिंगणात उतरले, प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर होताच पुतणे जयसिंग सोळंके यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टवरून उघड झाली आहे.

चार टर्म आमदार तर, तीन वर्षे राज्यमंत्रिपद भूषवणारे प्रकाश सोळंके यांनी शेवटची निवडणूक म्हणून मागील (२०१९) विधानसभा निवडणूक लढवली होती. यामुळे २०२४ च्या निवडणुकीत ते कोणाला वारसदार घोषित करतात? याची उत्सुकताही अनेकांना लागली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.