Exit Polls Marathi News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार संपल्यानंतर आता एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. यामध्ये जवळपास आठ ते दहा संस्थांनी मतदानोत्तर चाचण्या केल्या आहेत. त्यांच्या कलांनुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष राहण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील. तर मविआला १३० जागा मिळतील. परंतू एक असा एकमेव पोल आहे ज्यामध्ये महाविकास आघाडी स्पष्ट बहुमताजवळ पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे.