CM Eknath Shinde: ''एक हैं तो सेफ हैं! पंतप्रधानांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला'' मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला अर्थामागचा अर्थ

Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'एक हैं तो सेफ हैं' या विधानाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ते छत्रपती संभाजी नगर येथे माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वांनी सोबत राहून मतदान केलं पाहिजे, तोडा-फोडा आणि राज्य करा, हे धोरण अवलंबिणाऱ्या लोकांपासून दूर राहून एकत्र पाहिलं पाहिजे, असा त्या घोषणेचा अर्थ आहे.
PM Modi
CM Eknath Shindesakal
Updated on

Maharashtra Vidhan Sabha election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'कटेंगे तो बटेंगे' हा नारा दिल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारादरम्यान 'एक हैं तो सेफ हैं' असा नारा दिला. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि महायुतीचे नेते अजित पवार यांनी 'कटेंगे तो बटेंगे' या घोषणावेरुन नाराजी व्यक्त केली आहे. परंतु पंतप्रधानांच्या एक हैं.. च्या विधानाचं समर्थन होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.