मुंबई : माहिम-दादर विधानसभा मतदारसंघात सध्या अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. या ठिकाणाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर त्यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण आता भाजपनं अमित ठाकरेंना पाठिंबा जाहीर केल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे.
यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्ज मागे न घेण्यासाठी आपल्यावर मोठा दबाव आहे. त्यामुळ एकनाथ शिंदे यांनी मला उमेदवारी दिल्यानं त्यांचे आभार मानते तसंच राज ठाकरेंची आपण भेट घेणार आहोत, असं सरवणकर यांनी म्हटलं आहे.