प्रचार कार्यालयात येऊन उमेदवार प्रचाराला निघतो. तसेच उमेदवाराकडून वॉररूममध्ये आदल्या दिवशी रणनीती ठरवली जाते.
सांगली : केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk) लढवायची आणि जिंकायची, हे दिवस आता संपत आले आहेत. निवडणुकीसाठी प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागत आहेत. निवडणुका जिंकायच्या, तर कार्यकर्त्यांइतकीच ‘वॉररूम’ (War Room) आवश्यक बाब बनली आहे. इच्छुक उमेदवारांचा मतदानापर्यंतचा प्रवास सुकर करणारी यंत्रणा म्हणजे वॉररूम. हे एक प्रकारचे बंद खोलीतील युद्धच आहे.