महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातही पावसाची शक्यता होती. अशा स्थितीत आता हळूहळू तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. पाऊस गेल्यानंतर राज्यात कडाक्याची थंडी पडली असून त्यामुळे रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीची थंडी आहे. नाशिक, निफाड, धुळे या शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली आहे. यासोबतच येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. पुण्याच्या तापमानात चढ उतार दिसून येत आहे.