Congress Candidate List: काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय नाही? महाविकास आघाडीमध्ये पेच; आजच्या बैठकीत काय ठरलं?

Mahavikas Aaghadi: महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडे ९०-९०-९० जागांचे सूत्र निश्चित झाल्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. परंतु काँग्रेस १०५ जागांवर लढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Nana Patole
Nana PatoleSakal
Updated on

नवी दिल्ली: काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत शुक्रवारी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून काँग्रेसच्या वाट्याला जवळपास १०५ जागा येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने गुरुवारी ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली असून उर्वरित ५७ उमेदवारांची घोषणा शनिवारी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये अद्यापही काही जागांवर एकमत होऊ न शकल्याने मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.