महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. मोठ्या पराभावाला सामोरे गेल्यानंतर राष्ट्र्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पहिल्यांदाच याबाबत भाष्य केलं आहे. राज्यात कटेंगे तो बंटेंग सारख्या घोषणांमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले, त्यामुळे महाविकास आघाडीला बसला असं पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले की, आम्ही मतांच्या धृवीकरणाचे अधिक खोलात जाऊन विश्लेषण करु. मी काही घरी बसणार नाही नवी कर्तृत्वान पिढी घडवायची आहे असे विधान शरद पवार यांनी केले. शरद पवार यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.