दिल्लीमध्ये महिला मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रालाही पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. महायुती सरकारने 'लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे, ज्यामुळे महिलांशी संबंधित मुद्द्यांवर अधिक भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीही महिला उमेदवाराचा विचार करत असल्याचं दिसत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं.