Latest Mumbai News: महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांतील जागावाटप १५२, ८० आणि ५२ असे होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, चार नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत यासंदर्भात घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेला जागा देताना जेथे त्यांच्याकडे उमेदवार नसेल तेथे तो देण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांत बंडोबांना थंड करण्यावर भर दिला जाईल, असे समजते.
भाजपने या जागावाटपात मोठ्या भावाची भूमिका निभावली हे स्पष्ट दिसते आहे. महायुतीत विदर्भात अंतर्गत बंडाळीचा फारसा सामना करावा लागत नसला तरी पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात मात्र महायुतीचे उमेदवार परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.