महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील नावे मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी महाराष्ट्र निवडणुकीत एकूण १०,९०० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९८३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. अशा स्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या किती उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली आणि आता किती बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बंडखोरांमुळे आता महाराष्ट्रात विधानसभा १९९५ ची पुनरावृत्ती होणार असं चित्र निर्माण झाले आहे.