Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुती आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महायुती यांच्यातील लढतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र सकाळपासूनच महाविकास आघाडीला धक्के बसण्यास सुरूवात झाली. महाराष्ट्रातील बऱ्याच जागांवर महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. तर महायुती मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे.
या निवडणुकीत मतदानामध्ये महिलांची टक्केवारी जास्त होती. यावरूनच लाडकी बहीण महायुतीसाठी वरदान ठरली असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाजपने मोठ्या प्रमाणात नारेही दिले होते. याचा प्रभावही दिसून आला आहे.