Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव
Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सट्टाबाजारात महायुतीला १४५ ते १५३ जागा मिळण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी फेव्हरिट आहेत.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणूक नुकतीच संपली असून, सटोडीयांचे लक्ष सट्टा बाजाराकडे लागले आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अनेक बाबींनी चर्चेत असल्यामुळे सट्टाबाजारातदेखील याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.