महाराष्ट्रात भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर सरकार स्थापनेबाबत बैठकांचा फेरा सुरू झाला आहे. महायुतीत सहभागी तिन्ही पक्षांच्या आज स्वतंत्र बैठका होत आहेत. तसेच पुढील रणनिती आखण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे यांच्यासह अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले.या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे. ताज लँड हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे गटाची बैठक सुरू झाली. यात शपथविधी आणि मंत्रिपदाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आता शपथविधीच्या तारखेबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.