''राहुल गांधी संविधानाची खोटी प्रत दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करतात. शरद पवार अयोध्येत रामाच्या दर्शनाला गेले नाहीत. कारण त्यांना व्होट बँकेची भीती वाटली.''
इचलकरंजी : इचलकरंजीमध्ये कापड उद्योग मोठा आहे. याला पाठबळ देण्यासाठी महायुती सत्तेत आल्यावर येथे टेक्सटाईल पार्कची (Textile Park) उभारणी करू. त्यामुळे इचलकरंजीतील कापड निर्मिती व्यवसाय जागतिक स्तरावर पोहोचेल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी येथे दिले.