Ahmednagar Assembly Election 2024 : संगमनेरमधील टँकर पहिले बंद करा राधाकृष्ण विखे पाटील विजय संकल्प मेळाव्याद्वारे शक्तिप्रदर्शन

Ahmednagar Vidhan Sabha Election 2024 : वाळू आणि खडी माफियांच्या जीवावर दहशतीचे राजकारण करणाऱ्यांच्या संगमनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत.
Radhakrishna E. Vikhepatil
Radhakrishna E. Vikhepatilsakal
Updated on

राहाता : वाळू आणि खडी माफियांच्या जीवावर दहशतीचे राजकारण करणाऱ्यांच्या संगमनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. ज्यांना आपल्या मतदारसंघातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही, ते टँकरमुक्त शिर्डी मतदारसंघात विकासाची भाषा करतात. आजवर त्यांनी हसून इतरांची जिरवली. आता विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांची जिरवतील, अशा शब्दांत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्ला चढविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.