Mahim Assembly Constituency Result 2024
मुंबई : आदित्यनंतर ठाकरे परिवारातील आणखी एक सदस्य यंदाच्या निवडणुकित उतरल्याने सर्वांची उत्सुकता लागली . महाराष्ट्राच्या राजकारणात 'ठाकरे' हा ब्रँड किती मोठा आहे, हे वेगळं सांगायला नको. प्रत्यक्ष निवडणुकीत या घराण्यातून २०१९ पर्यंत कोणीच उतरले नव्हते, तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर ठाकरे नावाची पकड मजबूतच होती. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी ही परंपरा मोडली आणि निवडणुकीच्या मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. वरळी मतदारसंघातून ते जिंकलेही आणि अडीच वर्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्ताकाळात मंत्रीपदही भूषवलं.