Latest Political News: तीन वर्षांत सहकारी पक्षाला सामावून घेण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदावर आमच्या नेत्याने समाधान मानले असले तरी आता नव्या रचनेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीचे प्रतिध्वनी दिल्लीपर्यंत पोहोचले असून ‘महाराष्ट्र नायक’ झालेल्या फडणवीस यांना आता मुख्यमंत्रिपदापासून रोखणे हे काहीसे कठीण होण्याची शक्यता आहे.
२०१४, २०१९ या दोन्ही निवडणुकांच्या पाठोपाठ आता २०२४ सालीही फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला यश मिळाले आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षाने उत्तम कामगिरी केली. शिंदे लोकनेते आहेत, त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणली असली तरी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांनी त्याग करावा.