नांदुरा : ‘नेहमीची येतो,मग पावसाळा’ या उक्ती प्रमाणे दर पाच वर्षाला विधानसभेची निवडणूक येत असते. एकीकडे प्रशासकीय स्तरावर निवडणुकांना लोकशाहीचा महोत्सव म्हणून पाहिले जाते. तर दुसरीकडे सर्वसामान्य श्रमजीवी, शेतमजूर मतदार राजाला या समारंभाचे काहीएक देणेघेणे नसल्याचे चित्र सध्या तरी मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण परिसरात दिसून येत आहे.